Wednesday, 31 August 2022

गणराया सेवा

विघ्ननाश करुनि, सांभाळी मजला

प्रार्थितो तुजला, हे गणराया !!

बुद्धी ज्ञान शक्ती, ध्यानाचे साधन

करुनि ते ध्यान, दाखवावे !!
मूलाधारी वास, नित्य असे तुझा
पावी गणराजा, चाकरासी !!
जड माझी मती, हरोनी सुमती
द्यावी त्वा प्रचिती, अध्यात्माची !!
माझे अपराध, पोटी तुवा घेई
ज्ञानामृत देई, सत्संगाचे !!
नामी गुंतवोनी, नाशी तू वासना
पाही पाश नाना, तोडी वेगे !!
जन्मोजन्मी चुका, असंख्य मी केल्या
क्षालना निघाल्या, जन्म जाती !!
बाप माझा शंभू, माय माझी उमा
अपराधी क्षमा, तयांची मागे !!
घ्यावे सारे पोटी, तोडी आता बंध
मोक्षाचा संबंध, जोडोनि दे !!
सोSहं साक्षात्कार, दावी तू या देहा
परतोनी पहा, येणे नाही !!
@श्रीदत्तचरणरज

No comments:

Post a Comment