ओढ तुझी माझे मनी, नाम तुझे माझे वाणी ,
निराकार ज्योतीरुपा, रूप तुझे माझे नयनी ||
बाप तूचि माता तूचि, चराचारी व्यापित तूचि,
वस्तू तूचि दृश्य तूचि, दृष्टीचे या दर्शन तूचि ||
जिविताचे जीवन तूचि, मुक्ती आणि सद्गती तूचि,
कर्म आणि धर्म तूचि, जीवनाचे मर्म तूचि ||
कार्य आणि कारक तूचि, तारक अथवा मारक तूचि,
विघ्न विघ्नांतकही तूचि, साधनेतील साध्यही तूचि ||
व्याप्त आहे सर्वाठायी, दत्तमूर्ती त्रिगुणी पाही,
चरणरजतव प्रार्थी आई, उद्धरी तू या नरदेही ||
@श्रीदत्तचरणरज
श्रीवरददत्तात्रेय भक्तीसेवासमिती