जांबुवंत बना ....
आपलं मूल म्हणजे आपली झेरॉक्स कॉपी वाटली का?
माझा मुलगा इंजिनीअर होणार किंवा माझी मुलगी डॉक्टर होणार हे अगदी पेटंट घेतलेलं वाक्य ऐकून कंटाळा आलाय आता... अरे आतातरी बस करा आपल्या अपेक्षा आपल्या मुलांवर लादणं ...आपलं मूल म्हणजे काय आपली झेरॉक्स कॉपी आहे का कि जी १०१% आपल्या सारखीच असायला हवी ?
आपली जी इच्छा आणि मनोरथ अर्धवट राहिलं आहे ते सर्वस्वी आपल्या अपत्याने पूर्ण केलेच पाहिजे अन्यथा आपल्याला मेल्यानंतर मोक्ष सुद्धा मिळणार नाही ह्या गैरसमजात राहणे आता पुरे. आता खडखडून जागे व्हावेच लागेल. आपले मूल हे एक स्वतंत्र अस्तित्व असलेलं असं व्यक्तित्व आहे हे मान्य केलंच पाहिजे. माझं मूल माझ्या आज्ञेबाहेर नाही हा वृथा अहंकार जोपासून त्या मुलाचं अख्ख आयुष्य उध्वस्त करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही, किंबहुना असं करणं हे एक सामाजिक पापच आहे.
आपण आपल्या अपत्याला तो जसा आहे तसा स्वीकारणं हे सर्वात महत्वाचे. मग त्याची अभिव्यक्ती ओळखणं आणि ती जपणं आवश्यक आहे. त्याची तुलना इतर कोणत्याही व्यक्तींशी ना करता ती एक स्वतंत्र आणि स्वाभिमानी व्यक्ती म्हणून पुढे कशी येईल हे बघणं महत्वाचं आहे.
प्रत्येकजण इंजिनीअर अथवा डॉक्टर बनला तर मग समाजात पुन्हा मा. ध्यानचंदही असणार नाहीत व मा. फील्ड मार्शल करिअप्पा पण होणार नाहीत. पैसे हेच सर्वस्व नसतं हे आपणच त्यांना पटवून दिलं पाहिजे. सिकंदर जग जिंकू पाहत होता पण रिकाम्या हाताने गेला हेच सत्य आहे. त्या उलट तो फकीर साईबाबा सर्व जगाचा उद्धारकर्ता बनला. समाजात राहून समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो हे ध्यानात ठेवून जो आपला मार्ग आचरण करतो तोच शेवटी ही जीवनाची लढाई जिंकतो. कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी ही रचना त्यातूनच आली आहे कि जी मोठ्या उद्योगांना सुद्धा करणे क्रमप्राप्त आहे.
आपलं मूल वाढत असताना त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. पहिली काही वर्ष मुलाची शारीरिक आणि मानसिक पातळीवर वाढ होते. पण त्यानंतर पूर्ण आयुष्यभर त्याचा विकासच होत राहतो. विकासाच्या पाचही पातळ्या त्याला विकसित करण्याला साहाय्यभूत होणं हे प्रत्येक सुजाण पालकांचं आद्य कर्तव्य आहे. पण त्यासाठी आधी स्वतः ह्या पाच पातळ्या ओळखल्या पाहिजेत. शारीरिक विकास, मानसिक विकास, सामाजिक विकास, भावनिक विकास आणि अध्यात्मिक विकास ह्या सर्व विकासात आपलं साहाय्य हवंच.
मुलाचं स्वत्व जपणं, त्याला स्वाभिमानी बनवणं, स्वतःच्या चुका ओळखायला शिकवून त्या सुधारायला मदत करणं, वाचनासाठी उत्तम साहित्य उपलब्ध करून देणं, शिक्षणामध्ये प्रत्येक क्षेत्रात करिअर करण्याच्या कोणत्या संधी आहेत याची ओळख करून देणं, अभ्यासेतर गोष्टींची जसं संगीत, खेळ, वक्तृत्व, नृत्य, नाट्य, स्वसंरक्षण इत्यादीची ओळख करून देणं आणि त्याला आवडेल ते त्याला करण्याची मुभा देणं, सामाजिक मूल्य शिकवणं व समाजाचे बृहद हित कशात आहे हे समजून सांगणं, स्वतःच्या भावना उत्तम पद्धतीने व्यक्त करायला शिकवणं, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःला जाणून घेणं ह्या गोष्टी आपण आपल्या मुलांना शिकवल्याच पाहिजेत.
हे सर्व ना देता आपण फक्त पैसे पुरवतो आणि त्याने सर्व काही होईल हा अंध विश्वास ठेवतो. आपलं मूल ही एक शेअर मार्केट मधली कमोडिटी आहे आणि त्याचा बाजार भाव वाढला पाहिजे ह्या साठी आपण आपला जीव ओवाळून टाकतो पण आपल्या हे ध्यानात येत नाही कि ती एक वस्तू नाही तर त्याच्यातही प्राण आहे, त्यालाही स्वतःचं मन आणि मत आहे आणि तो व्यक्त करण्याचा जन्मजात अधिकार सुद्धा.
मुलं चुकतील त्यांना सांभाळा. चुका पाठीशी घालू नका तर त्यातून काय शिकायचं हे सांगा. त्यांना धडपडू द्या. तुम्ही अपंगांची काठी बनू नका तर त्यांना त्यांच्या ताकतीची जाणीव करून देणारे जांबुवंत बना.
(जांबुवंत हे अस्वल रूपी असूनही त्यांनी रामाला सीता शोधामध्ये खूप मदत केली आणि त्यांनीच हनुमानाला आपल्या ताकदीची आठवण करून दिली कि ज्याचा हनुमानाला पूर्वीच्या शापामुळे विसर पडला होता.)