काम क्रोध लोभाचे माहेर
तोडुनी करीशी सत्तांतर,
मोह मायेचा महासागर
आटवूनी नाशिसी ।।
राज्य स्थापिशी हृदयात
चरण स्थिर ठेवीशी त्यात
नामस्मरणाने सुप्रभात
नित्य नित्य होतसे ।।
ताबा घेशी इंद्रियांचा
वारू धरीशी मनाचा
सत्कर्म मार्गे काया वाचा
अखंड चाले ।।
इच्छा एक हीच असावी
काया तुझ्या चरणी विसावी
श्रीदत्तचरणरज आर्जवी
धाव पाव रे नारायणा ।।