Sunday, 24 July 2022

पांडुरंग माझा

 जीवीचा जिव्हाळा, पांडुरंग माझा! 

मोक्षाचा सोहाळा, पांडुरंग माझा! 


अभंगाचा रंग, पांडुरंग माझा! 

भजनात दंग, पांडुरंग माझा!


लेकरांची माय, पांडुरंग माझा!

कामधेनू गाय, पांडुरंग माझा!


डोळीयांचे रूप, पांडुरंग माझा!

चित्ताचे चिद्रुप, पांडुरंग माझा!


आता ध्यास एक, पांडुरंग माझा!

आता आस एक, पांडुरंग माझा!


@श्रीदत्तचरणरज

No comments:

Post a Comment